Science Forum Nashik

About Us  |  Objectives | Founder Members | Active Members | Activities | Photo Gallery | Videos | Contact Us

H.P.T. Arts and R.Y.K. Science College & Science Forum Nashik
प्रथम स्मृती दिन 27 जुलै 2022

Student should upload their videos on the link: https://t.me/sciencforumnashik 

(Before uploading videos using mobile; you have to install Telegram-App in your mobile.  Use link to install Telegram-App https://www.sirhow.com/install-telegram-app/ ). Selected videos will be uploaded on the following link:

https://www.youtube.com/channel/UCUF5FmVbG4UQv6e5f3GYBXw

We are an informal group, committed on creating science awareness in our community through all communication channels.

Keen to share your knowledge and expertise in any field on science and technology ?
To know the cutting edge of contemporary happenings in the world of science & technology the place to be is ‘SCIENCE FORUM’
 

About Us

The Science Forum is an informal group of science enthusiasts, located in Nashik – a district place in the state of Maharashtra, India. It was formed in the year 1978 to foster discussions about contemporary science and technology issues at a mature level. The genesis of the Science Forum can be attributed to an informal meeting of several prominent persons including school teachers, college teachers, school Principals and industrialists in the year 1978.  In the course of the discussion, it becomes clear that Nashik did not have any forum to discuss the current science issues. The consensus was that there is a pressing need for a forum to talk about science and technology issues. We are committed to creating science awareness in our community through all communication channels. We just don’t talk or hear! We listen, we observe, we experience, we argue, we question; we interact – in a friendly, informal way, of course! To know the cutting edge of contemporary happenings in the world of science & technology the place is – ‘SCIENCE FORUM.’ Join us in the fun to know what the contemporary march of science and technology is all about.

Our is a motley crowd; whoever you are, you are most welcome! Stay tuned !

Objectives

The objectives of the Science Forum were decided as follows:

  1. To generate interest in science,
  2. To discuss the cutting edge of science and technology issues,
  3. To inculcate scientific curiosity in young minds,
  4. To generate and foster a scientific attitude,
  5. To develop scientific literacy

It was further resolved that

  1. There will be no office bearers. Shri Anil Kshatriya will work as the convener and all other members will help him for the smooth running of the group.
  2. There should not be any personality cult and there should not be felicitations etc. of members.
  3. The programs should start at the appointed time.
  4. The invited speaker should be given maximum time for his talk. He will not be given the bouquets, shawls, etc.
  5. No grants from the government and no contributions from the general public are taken.

Since its inception in the year 1978, the Science Forum has acquired a reputation for the quality of programs, informality and punctuality. The Science Forum holds programs at the school level, college level and at a level that can approach the level of the general public.

Founder members

  1. Late Shri Anil Kshatriya (Professional)
  2. Late Mr. M. S. Bafna (Science Teacher, Pethe High school, Nashik)
  3. Dr. V. Balasubramaniyan (Lecturer, Organic Chemistry)
  4. Late Principal Dr. B. D. Chaure (Physics, HPT/RYK College)
  5. Shri Avinash S. Gadgil (Lecturer, Physics)
  6. Late Dr. V.M. Gogate ( Prominent Social Worker and doctor)
  7. Dr. N.C Gujrati (Lecturer, Physical Chemistry)
  8. Mr. G. G. Gujarathi (Head Master, Pethe High School)
  9. Mr. P. G. Guajrathi (PG Student, Physics)
  10. Dr. D. N. Lele (ENT Surgeon and prominent social worker)
  11. Mr. J. V. Phalke (Professional)
  12. Prof. C. V. Sahasrabuddhe (Lecturer, Physics)
  13. Late Dr. P. B Vaidya (Lecturer, Botany)
  14. Late Dr. Padma Balasubramaniyan (Lecturer, Organic Chemistry)

Our Convener Shri Anil Kshatriya

Shri Anil Kshatrya, who discharged his duties as the Convener with full dedication from 1978 till his demise in 2021, was the driving force behind the Forum. Here is the tribute paid to him after his death by one of our members.

विज्ञानव्रती अनिल क्षत्रिय

आपल्या अवतीभोवती काही माणसे अशी असतात ज्यांनी एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी स्वत:ला वाहून घेतलेलं असतं; पण ती प्रकाशझोतापासून नेहमीच दूर असतात. त्यामुळं त्याचं मोठेपण समाजाच्या  लवकर लक्षात येत नाही. वरवर सामान्य वाटणारी ही ध्येयवेडी माणसं असामान्य काम करून जातात. नुकतेच दिवंगत झालेले नाशिकचे अनिल क्षत्रिय अशा अगदी मोजक्या व्यक्तींपैकी एक होते. त्यांचं व्रत होतं विज्ञान प्रसाराचं.

ते साल होतं १९७८. आपल्या काही समविचारी मित्रांच्या मदतीनं त्यांनी एक छोटासा गट तयार केला. त्याला नाव दिलं ‘सायन्स फोरम’. हा गट अगदी अनौपचारिक पद्धतीनं चालवला जायचा. म्हणजे या फोरमला ना कुणी अध्यक्ष होता ना कार्यवाह. क्षत्रिय सर त्याचे संस्थापक, अध्यक्ष, कार्यवाह आणि स्वयंसेवक – सर्व काही होते. त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे ४३ वर्षं ते तन, मन , धनाने या फोरमशी आणि पर्यायानं विज्ञान प्रसाराशी एकरूप झाले होते.  

या सर्व काळात  त्यांनी अत्यंत निष्ठेने विज्ञान प्रसाराचे काम केले. या फोरमसाठी त्यांनी काही दंडक घालून दिले होते. पहिली गोष्ट म्हणजे कोणताही कार्यक्रम वेळेवरच सुरू करायचा. श्रोत्यांची संख्या कितीही असली तरी ही वेळ  चुकवायची नाही. हळूहळू ही शिस्त सर्वांच्या अंगवळणी पडली आणि श्रोते वेळेवर येऊ लागले. दुसरं पथ्य म्हणजे मुख्य वक्त्याला हारतुरे न देणे. ‘फुलं झाडावरच चांगली दिसतात म्हणून आम्ही पुष्पगुच्छ देत नाही’ असं ते वक्त्याला नम्रपणे पण ठामपणे सांगत. सत्कार- हारतुरे यात वेळ न घालवता वक्त्याला जास्तीतजास्त वेळ उपलब्ध करून देण्याबाबत त्यांचा कटाक्ष असे.  तिसरी गोष्ट म्हणजे ते व्यासपीठावर कधीच  बसत नसत. व्यासपीठावर फक्त वक्ता आणि सूत्रसंचालक यांनीच बसावे असं त्यांचा आग्रह असे. क्षत्रिय सरांची या सगळ्या कामाबाबतची तळमळ इतकी असे की ती पाहून  ४३ वर्षात एकाही वक्त्याने भाषणाचे मानधन घेतल्याचं मला आठवत नाही.

या फोरमतर्फे आयोजित केलेल्या भाषणांची संख्या शेकड्यात मोजावी लागेल. विज्ञानाची अशी एकही शाखा नसेल जिच्यासंबंधी फोरमने भाषण आयोजित केलेले नाही. नाशिकच्या जनतेला खऱ्या अर्थानं विज्ञानसाक्षर करण्याचं अतिशय मोलाचं काम या भाषणांनी केलं आहे. २८ फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन. सायन्स फोरमने हा दिवस न चुकता अनेक वर्षं साजरा केला – अर्थातच एखादे उत्तम भाषण आयोजित करून.  विज्ञानातली एखादी संकल्पना असेल, एखादा महत्त्वपूर्ण शोध असेल – त्याबाबत सामान्य व्यक्ती मुळापासून वाचू लागली तर तिला अनेकदा नीट आकलन होत नाही. पण तोच विषय एखादा तज्ज्ञ, भाषणातून सोपा करून सांगत असेल तर तो  विषय लवकर समजतो. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन अनिल क्षत्रिय सर नेहमी योग्य वक्त्याच्या आणि योग्य विषयाच्या शोधात असत.

या सगळ्या कामासाठी  सरांनी जी माणसं जोडली होती ती केवळ शिक्षण क्षेत्रातली नव्हती. या कार्यकर्त्यांमध्ये उद्योजक होते, दूरसंचार कार्यालयात काम करणारे अधिकारी होते, औद्योगिक क्षेत्रात नोकरी करणारे होते, डॉक्टर होते –इतकंच नव्हे तर पोलीस अधिकारीही होते ! विशेष म्हणजे सरांनी त्यांचं काम फक्त फोरमपुरते मर्यादित ठेवलं नाही. २००२ मध्ये त्यांनी नाशिक शहरातल्या सगळ्या विज्ञान –संस्थाना एकत्र आणलं आणि तीन दिवसांचा विज्ञान-उत्सव साजरा केला. त्यात विज्ञान प्रदर्शन होतं, नामवंतांची भाषणं होती. पुढच्या काळात सरांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी छंद वर्गाचं आयोजन करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांना आर. वाय. के. महाविद्यालयाची खूप मदत झाली. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणारा सात दिवसांचा हा वर्ग नाशिकमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे एक मोठं आकर्षण ठरला आहे.  या वर्गाचा एक भाग म्हणून मुलांनी बनविलेल्या वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शनही भरवले जाते. हा उपक्रम पंधरा  वर्षं सतत चालू आहे आणि याद्वारे अक्षरश: शेकडो विज्ञानप्रेमी घडवण्याचं मोठं काम क्षत्रिय सरांनी केलं आहे.

सरांच्या प्रेरणेनं अनेक विज्ञान-सहली काढल्या गेल्या. नाशिकमध्ये तसेच शिरपूरसारख्या ठिकाणी जाऊन विज्ञान-शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या. दुर्गम अशा आदिवासी भागात जाऊन तेथे शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान-प्रदर्शन भरवण्याची कल्पनाही क्षत्रिय सरांनी प्रत्यक्षात आणली. एका वर्षी आदिवासी भागातल्या शेकडो विद्यार्थ्यांना विशेष बसमधून त्यांनी नाशकात आणवले आणि त्यांना प्रदर्शनात सहभागी करून घेतले.

मी आज सरांबाबत हे सगळं लिहितो आहे खरा पण माझं हे लेखन सरांनी वाचलं असते तर त्यांना ते अजिबात आवडलं नसतं. याचं कारण म्हणजे मी त्यांना दिलेलं श्रेय. त्यांच्या बद्दल थोडंसुद्धा गौरवानं बोलण्याची संधी त्यांनी कधीच कोणाला दिली नाही. आणि आज मी तसं बोलतो आहे तर सर या जगात राहिलेले नाहीत. अशी माणसं आता खरंच खूप शोधूनही सापडत नाहीत.

सरांनी हे जे कार्य केलं ते करताना  त्यांना खूप चांगले सहकारीही लाभले. पण तरीही त्यात मुख्य भूमिका सरांचीच होती. त्यांची तळमळ, पारदर्शी स्वभाव, आयोजनातला  काटेकोरपणा, त्यांचं सौम्य –सुसंस्कृत  बोलणं, उतारवयातही कष्ट घेण्याची तयारी, एखाद्या ठरलेल्या  गोष्टीचा ते करत असलेला पाठपुरावा अशा त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ते सर्वांसाठी आदराचं स्थान बनले होते. त्यांनी वाढवलेल्या दाढीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळाच भारदस्तपणा आलेला होता. त्यामुळे ते विज्ञान –ऋषी भासत.  

अनिल क्षत्रिय सरांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली होती. त्यानंतर त्यांनी  काही काळ अमेरिकेत सैद्धांतिक भौतिकशास्त्र या विषयात संशोधनही केले. त्या काळात रिचर्ड फेनमन, जॉन व्हीलर, एल. आय. पावलिंग, विल्यम फौलार   अशा अनेक नामवंत वैज्ञानिकांची भाषणे ऐकण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्याबाबतच्या अनेक आठवणी ते सांगत. नाशिकच्या आर. वाय. के. सायन्स महाविद्यालयात त्यांनी काही काळ भौतिकशास्त्र विषयाचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले होते.  क्षत्रिय सरांचे इंग्रजीवर असामान्य प्रभुत्व होते. मातृभाषेत बोलावं इतक्या सहजतेनं ते इंग्रजीत बोलत. भौतिकशास्त्र या विषयाचे  त्यांना मनस्वी आकर्षण होते आणि त्या विषयाची त्यांना उत्तम जाणही होती.  या विषयात  मला कधीही काही शंका निर्माण झाली तर मी लगेचच त्यांना ती  विचारत असे आणि ते अगदी सहजपणे त्या शंकेचे निरसन करत. मला त्यांचा सुमारे ३० वर्षांचा सहवास लाभला. मी  त्यांच्याबरोबर मुंबईला दोन वेळा केवळ भाषणे  ऐकण्यासाठी गेलो होतो – त्यापैकी एक भाषण होतं जगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचं आणि दुसरं होतं रॉजर पेनरोज यांचं. (पेनरोज यांना २०२० मध्ये भौतिकशास्त्र विषयाचं नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं आहे ). क्षत्रिय सरांनी व्यक्तिश: मला वाचन –लेखन –भाषण यासाठी सतत प्रोत्साहन दिलं. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे या वर्षीचा विज्ञान-दिन. त्यांनी सुमारे दोन महिने आधीच मला सांगून ठेवलं होतं की या दिवशी  मी ‘२०२० सालचे भौतिकशास्त्र  या विषयाचे  नोबेल पारितोषिक’ या विषयावर बोलावे. त्याप्रमाणे, मुक्त विद्यापीठाच्या मदतीने सरांनी तो कार्यक्रम घडवून आणला.

सरांचे मूळ गाव सिन्नर. घराणे प्रसिद्ध उद्योजकाचे. त्यांचे वडील म्हणजे जगन्नाथसा क्षत्रिय.  त्यांनी त्यांच्या वडिलांच्या म्हणजे भिकुसा यमासा क्षत्रिय यांच्या स्मरणार्थ नाशिकच्या गोखले शिक्षण संस्थेला मोठी देणगी दिली आणि बी. वाय. के. वाणिज्य महाविद्यालय उभं राहिले.  अशा दानशूर घराण्याचे एक घटक असलेल्या क्षत्रिय सरांचं  बोलणे –वागणे अतिशय सौम्य असे. कोणत्याही व्यक्तीबद्दल वावगा शब्द त्यांच्या बोलण्यात कधीही येत नसे. ते अविवाहित होते. त्यामुळं रूढार्थाने त्यांचे स्वत:चे कुटुंब नव्हते.  पण आपल्या अतिशय आपुलकीच्या वागण्यानं त्यांनी अनेक विज्ञान –प्रसारकांचे मिळून एक विस्तारित कुटुंब  तयार केले. अशी माणसं आता होणे नाही.

शेवटचे काही महिने ते बरेच आजारी होते. मधुमेहाचे जुनं दुखणं अधूनमधून उफाळून येत असे. या काळात त्यांचे धाकटे बंधू किशोर आणि त्यांच्या पत्नीने त्यांची उत्तम काळजी घेतली. सरांचा मला अधूनमधून फोन येत असे. पण शेवटीशेवटी त्यांचे शब्दांचे उच्चार कळेनासे झाले होते.

क्षत्रिय सर मुद्रण-व्यवसायात होते. कागदावर अक्षरे उमटविणे हा त्यांच्या कामाचा भाग होता. पण त्यांनी केवळ कागदावर अक्षरे  उमटविलेली नाहीत  तर आपल्या कार्याने असंख्य विज्ञान- प्रेमींच्या  मनावर ठसठशीत मुद्रा उमटवून त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

(३१ जुलै २०२१)
गिरीश पिंपळे, मो. ९४२३९६५६८६ (सदस्य, सायन्स फोरम)

Active members

  1. Kishor Kshatriya
  2. Dr. Pravin P. Joshi
  3. Uday Khedkar
  4. Smita Khedkar
  5. Nilima Ugaonkar
  6. Dr. Sanket Mahajan
  7. Sujata Babar
  8. Dr. Harish Kulkarni
  9. V. B. Raigaonkar
  10. Dheeraj Dhiman
  11. Kumudini Bangera
  12. Dr. Ramchandra Tiwari
  13. Prin. Dr. V. D. Barve
  14. Prin. Dr. V. N. Suryawanshi
  15. Prin. Dr. Prashant Patil
  16. Dr. S. B. Supekar
  17. Dr. Gireesh Pimpale
  18. Shri Pravin Kothavde

The recent ‘Talks of the Town’

  • Biology of space travel
  • Cybernetics
  • Sociology of science
  • Electrosensitive papers
  • Ozone ‘hole’
  • Expedition to Antarctica
  • Tiger census
  • Internet and Web browsing
  • Experimental demonstration of Raman effect
  • Top Quark
  • Lives of a star
  • Vedic Mathematics
  • Dolly, the clone !
  • Pathfinder mission to mars
  • Science of consciousness
  • Union Budget.


We just don’t talk or hear! We listen, we observe, we experience, we argue, we question, we interact ! – in a friendly, informal way, of course!
Lot too many things happen under the sun all too soon, to fast !

Join us in the fun to know what contemporary march of science and technology is all about as we enter the 21st century.
Our is a motley crowd; whoever you are, you are most welcome! Stay tuned ! More coming your way.

 

& Many Many More!
We meet once a month (or more) at convenient time in the evening.
Interested? Making a presentation?
Support us with a donation? Suggest current topics? Become a member?

Science Forum Nashik
Science Forum Nashik
Science Forum Nashik
Science Forum Nashik
Science Forum Nashik
Science Forum Nashik
Science Forum Nashik
Science Forum Nashik
Science Forum Nashik
Science Forum Nashik